Logo Royal Education Society's
संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय
College of Computer Science and Information Technology
Ambajogai Road, Latur - 413531 (Maharashtra) India.
Re-Accredited by NAAC with B+ Grade
Web-Mail Login Staff Login

Custom Search

Recent Events

Induction Programme For BCA and BBA From 05-11-2024 to 13-11-2024

बी.सी.ए. आणि बी.बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी घेण्यात आलेल्या इंडक्शन प्रोग्रामचे मुख्य ठळक मुद्दे (5/11/2024 ते 13/11/2024 दरम्यान आयोजित)

बी.सी.ए. व बी.बी.ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची औपचारिक सुरुवात दि. 5 नोव्हेंबर 2024 पासून झाली.
या निमित्ताने इंडक्शन कार्यक्रम आयोजित केला गेला, यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आणि भविष्यातील करकिर्दीसाठी तयार करण्यासाठीआवश्यक असलेल्या महत्वाच्या बाबींची माहिती दिली गेली.
विविध क्षेत्रात काम करत असलेल्या सन्माननीय आणि यशस्वी व्यक्तीचे खालील विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.

✅मानवी मूल्य आणि विकास
✅उद्योजकता विकास
✅हेल्थ आणि फिटनेस
✅हेल्थ आणि योगा
✅लातूर आणि लातूर जिल्ह्याबद्दलची सविस्तर ओळख,
✅क्रिएटिव्ह आर्ट्स म्हणजेच सृजनशील कला.
✅हेल्थ आणि मानसिक आरोग्य
✅प्रोफिशियन्सी स्किल्स- यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाबद्दलची ओळख, इंटरनेट आणि कम्प्युटर नेटवर्क बद्दलची माहिती

इत्यादी विषयाबद्दलच सविस्तर माहिती देण्यात आली.

Day 1

1. उद्घाटन समारंभ


उद्घाटन समारंभात रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय डॉ. एम. आर. पाटील सर यांनी बी.सी.ए आणि बी.बी.ए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्रामच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या प्रेरणादायक भाषणात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य साध्य करण्यासाठी त्यांचे ध्येय स्पष्ट ठेवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, आणि सतत शिकण्याची भावना यावर भर दिला. डॉ. पाटील यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही, तर व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा मिळवण्यासाठी लागणारे कौशल्ये प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली.

2. श्री. विवेक सौताडेकर यांचे भाषण

सुप्रसिद्ध वक्ते आणि साहित्य व इतिहास तज्ञ श्री. विवेक सौताडेकर यांनी मानवी मूल्ये या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी इतिहास, साहित्य आणि नैतिक कथांद्वारे सर्व मूल्ये समजावून सांगितली. 3. श्री. गोविंद सिरसाट यांचे चित्रकला आणि पेंटिंग सादरीकरण

शारदा इंटरनॅशनल स्कूलचे कला शिक्षक श्री. गोविंद सिरसाट यांनी चित्रकला आणि पेंटिंगवर सादरीकरण केले व या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन केले.

Day 2

1. श्री. विवेक सौताडेकर यांचे 'लातूर; त्याचा इतिहास आणि वर्तमान' विषयावरील भाषण

साहित्य व इतिहास तज्ञ श्री. विवेक सुतारदेकरी यांनी लातूरचा इतिहास आणि वर्तमान यावर भाषण दिले आणि विद्यार्थ्यांना लातूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाबद्दल माहिती दिली.

2. डॉ. पवन लड्डा यांचे आरोग्य व आहार विषयक भाषण

लातूर वृक्ष चळवळीचे नेतृत्व करणारे सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. पवन लड्डा यांनी या वेगवान जीवनशैलीत निरोगी आहार आणि व्यायामाचे महत्त्व सांगितले.
साधा आहार आणि सवयी जर आपण पाळणा तर आपण उत्तम आरोग्य राखू शकतो

डॉ. एन. एस. झुल्पे: माजी प्राचार्य

डॉ. झुल्पे यांनी COCSIT च्या मिशन आणि व्हिजन बद्दलची माहिती दिली. त्यांनी कॉलेजच्या आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग, आणि उद्योग क्षेत्राशी असलेले संबंध, विद्यार्थ्यांच्या करियरसाठी आणि यशासाठी महाविद्यालय कसा पाठिंबा देते यावर चर्चा केली. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अलेला महाविद्यालयातील विधार्थी व विध्यार्थ्यांच्या प्लेसमेंट चा आलेख बद्दल चर्चा केली

श्री. व्यंकटराव मुंडे यांचे योग व प्राणायाम सत्र

योगाचार्य आणि बीएसएनएलचे निवृत्त विभागीय अभियंता श्री. व्यंकटराव मुंडे यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगितले. श्री. मुंडे यांनी वैज्ञानिक पद्धतीने योग व प्राणायाम कसे करावे हे शिकवले.

Day 3

प्रसिद्ध युवा उद्योजक श्री. तुकाराम पाटील यांनी उद्योजकता विकास या विषयावर प्रेरणादायी भाषण

प्रसिद्ध युवा उद्योजक श्री. तुकाराम पाटील (संचालक, द्वारकादास शामकुमार,) यांनी उद्योजकता विकास या विषयावर प्रेरणादायी भाषण दिले. त्यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रथम ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्याचा सखोल अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन, मार्केटचे ज्ञान, आणि ग्राहकांच्या गरजा ओळखून काम केल्यास यशाचा मार्ग सुलभ होतो. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, सुरुवातीला अडथळे येतील, पण दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीने सर्व अडथळे पार करता येतात. तुम्ही जेवढा अभ्यास आणि तयारी करता, तेवढी तुमची यशाची शक्यता वाढते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. डी. आर. सोमवंशी: उपप्राचार्य

डॉ. सोमवंशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 बद्दल चर्चा केली, जे लवचिक, कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे शिक्षण अधिक व्यावहारिक बनते. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, BCA अभ्यासक्रम कसा तयार केला गेला आहे, ज्यामध्ये प्रोग्रामिंग आणि डेटा व्यवस्थापन, फुल स्टॅक डेव्हलोपमेंट, यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला गेला आहे, जे उद्योगाच्या गरजांना पूर्ण करतात आणि विधार्थ्याना चांगल्या संधी उपलब्थ करून देतात.

Day 4

प्रसिद्ध उद्योजक श्री. निलेश ठक्कर (संचालक, महाराष्ट्र बायो-खत लातूर) यांनी उद्योजकता विकास या विषयावर प्रेरणादायी भाषण

भविष्यात येणाऱ्या संकटांना आनंदाने स्वीकारा आणि त्यावर सामंजस्याने मात करा, म्हणजेच यश तुमचे होईल. सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्य हे उद्योजकतेतील यशाचे खरे गुण आहेत, असे ठक्कर यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना धाडस दिले की, प्रत्येक अडचण एक नवीन संधी घेऊन येते, आणि त्या संधीचा योग्य उपयोग करूनच मोठे यश प्राप्त करता येते.

डॉ. दत्ता आंबेकर (विषय: आरोग्य आणि फिटनेस)
जबाबदारी घ्यायला शिका आणि दुसऱ्याला दोष देत बसू नका. कृतज्ञता आपल्या अंगी असली पाहिजे, कारण तीच आपल्याला जीवनात सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा देते.

डॉ. व्ही. व्ही. भोसले: उपप्राचार्य

डॉ. भोसले यांनी कॉलेजच्या अंतर्गत परीक्षा पद्धतीबद्दल समजावले, ज्यामध्ये युनिट चाचण्या आणि प्री-सेमेस्टर परीक्षा यांचा समावेश आहे, तसेच गटचर्चा आणि सेमिनार्स सारख्या विविध अंतर्गत क्रियाकलापांची माहिती दिली. हे मूल्यमापन आणि क्रियाकलाप विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात, सुधारण्यात आणि परीक्षा तसेच करिअरसाठी तयारी करण्यात मदत करतात.

Day 5

डॉ. मिलिंद पोतदार - प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ (विषय: मानसिक आरोग्य)

डॉ. मिलिंद पोतदार हे प्रसिद्ध मानसिक आरोग्य तज्ञ आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यासाठी योग्य उपचार कसे केले पाहिजे यावर विस्तृत मार्गदर्शन केले आहे. ते मानतात की, मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी केवळ मानसिक विकास नाही, तर भावनात्मक समतोल (EQ) देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणारी शाळा, समाज आणि कुटुंब यांचा एकत्रित प्रभाव असावा लागतो.

स्पर्धेमध्ये यश मिळवायचे असेल तर बुद्ध्यांक(IQ) सोबत भावनांक(EQ) हा महत्त्वाचा असतो.

श्री. शामराव लवांडे: संचालक, धाडास प्रशिक्षण केंद्र, लातूर (विषय: लाखो लोकांसमोर भाषण करा जग जिंका)

श्री. लवांडे यांनी मोठ्या प्रेक्षकांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलायचे आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून "जग जिंका" यावर प्रेरणादायी भाषण दिले. त्यांनी स्टेज फियरवर मात करण्यासाठी तंत्र समजावून सांगितले, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, शारीरिक भाषा, आवाजाचा सूर आणि डोळ्यांचा संपर्क कसा वापरावा, याबाबत टिप्स दिल्या ज्यामुळे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित होईल आणि दीर्घकालीन प्रभाव पडेल. श्री. लवांडे यांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक बोलणे हे वैयक्तिक विकासाचे एक साधन मानण्याची प्रेरणा दिली आणि त्यांना आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नियमितपणे सराव करण्याचे साहस दिले.

Day 6

अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर श्री. माधव बावगे सर यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन झाले.

तसेच बब्रुवान गोमसाळे, संचालक अंजनी हॉटेल, लातूर यांनी अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरती थोडक्यात माहिती दिली
श्री. माधव बावगे सर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात
त्यांनी भानामती कशी होते, तसेच बाबा लोक किंवा भामटे लोक जिभेतून सुई कशी आरपार नेहून दाखवतात, याबद्दल स्पष्ट केले. उदाहरणार्थ, जर दिव्यात पाणी टाकले आणि त्यामध्ये कॅल्शियम कार्बाइड (CaC₂) टाकला, तर त्यापासून अॅसिटिलीन (C₂H₂) नावाचा ज्वलनशील गॅस तयार होतो. अॅसिटिलीन गॅसला जर ऑक्सिजनची थोडीशी मात्रा मिळाली आणि दिवा पेटवला, तर दिवा पेट घेतो. बाबा लोक हे जादू म्हणून दाखवतात, पण हे सायन्सद्वारे स्पष्ट होऊ शकते.
उपलब्ध ज्ञानाला अनुभवाच्या आधारे तपासल्यानंतर टिकते ती श्रद्धा असते आणि जी टिकत नाही ती अंधश्रद्धा असते असे श्री माधव बावगे म्हणाले.

Day 7

श्री. विवेक सौताडेकर:

संभाषण कौशल्य हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे, कारण त्याच्या माध्यमातूनच आपण आपले विचार, भावना आणि उद्दिष्टे प्रभावीपणे व्यक्त करू शकतो. विनम्रता आणि आदर्श भाषाशैली माणुसकीला वाव देतात आणि संवाद अधिक प्रभावी होतो. उत्कृष्ट बोलण्यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासात वृद्धी होते आणि तो समाजात आदर आणि सन्मान मिळवतो. योग्य शब्दांचा वापर, स्पष्टता, आणि श्रोत्याच्या भावनांचा आदर हे संभाषण कौशल्याचे मुख्य घटक आहेत, ज्यामुळे आपल्याला विकासाच्या मार्गावर नेणारे दरवाजे खुले होतात.

श्री.एन डी जगताप: कन्सल्टंट डायरेक्टर

श्री. जगताप यांनी आयटी क्षेत्रातील विविध प्रकारच्या नोकऱ्यांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि डेटा सायंन्स यांसारख्या भूमिका समाविष्ट आहेत. प्रत्येक भूमिकेचे स्वरूप आणि त्यासाठी लागणारी कौशल्ये समजावून सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत शिकत राहण्याचे आणि त्यांची कौशल्ये विकसित करण्याचे प्रोत्साहन दिले.

Day 8:

मा. श्री. चंदूलाल बालकृष्ण बलदवा, संचालक, बतिरा होजियरी, एम.आय.डी.सी., लातूर तथा अध्यक्ष, लातूर तिल्हा समूह संघटना, लातूर यांनी उद्योजकता विकास या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी व्यवसाय उभारणीतील विविध अडथळे, संधी आणि आव्हाने यावर आपले विचार मांडले. तसेच, उद्योजकता क्षेत्रातील नवीन कल्पना, ग्राहकांसोबतचे नाते, बाजारातील स्पर्धा आणि आर्थिक नियोजन यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून दिले.

श्री.कैलास जाधव(ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर)

यांनी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग टिल प्लेसमेंट या विषयावरती मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयात चालवली जाणारे विविध ट्रेनिंग प्रोग्राम बद्दलची माहिती तसेच प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी महाविद्यालय करत असलेले प्रयत्न, महाविद्यालयात प्लेसमेंट साठी नियमित येत असलेल्या मल्टिनॅशनल कंपन्या, त्यांचा प्लेसमेंट क्रायटेरिया, याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
तसेच इंडक्शन प्रोग्राममध्ये दोन विषयांवरील प्रोफिशियन्सी स्किल्सचा खालील दोन विषयाच्या आठ दिवसांचा अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले:

1. माहिती तंत्रज्ञानाचे परिचय, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि एमएस ऑफिस.
2. इंटरनेट संगणक नेटवर्क आणि प्रोग्रॅमिंगचा परिचय.

या प्रोफिशियन्सी स्किल्सचा आठ दिवसांचा अभ्यासक्रम तयार केला गेला आणि महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकामार्फत विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला.

Event Photo Gallery

Glimpses of the Commendation Programme
Back to Top