कॉक्सिटमध्ये सडक सुरक्षा-जीवन रक्षा कार्यक्रम संपन्न

शनिवार, जानेवारी 11, 2020


11:30 AM

कार्यक्रम माहिती

संयोजक :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर
प्राचार्य :

डॉ. एन. एस. झुल्पे,
कॉक्सीट, लातूर
मार्गदर्शक :

श्री. संदिप सुभाष शिंदे
मोटार वाहन निरीक्षक, लातूर

लातूर येथील कॉक्सिट अर्थात संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दि. 11 जानेवारी 2020 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर द्वारे 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत “रस्ता सुरक्षा-जीवन रक्षा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक श्री. संदिप सुभाष शिंदे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे सर्वांना होणा-या फायद्याबाबत व वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणा-या दुष्परिणामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, यामध्ये पुढे सांगताना ते म्हणाले की, रुग्णवाहिकेला वाहतुकीमधुन रस्ता देण्याच्या बाहेरदेशातील पद्धती व आपल्या देशातील पद्धतीचे उदाहरण देत आपल्या देशातील वाहतुकीमध्ये रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यामुळे ब-याच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी वाहन चालवित असताना रुग्णवाहिकेला ट्राफिकमध्ये रस्ता कसा देता येईल याबाबत पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत जेणेकरुन एखाद्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आपला हातभार लागेल.

या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी हा कार्यक्रम महाविद्यालयात राबविल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर चे आभार मानले, तसेच परिवहन कार्यालयामार्फत राबविल्या जाणा-या सर्व कार्यक्रमासाठी कॉक्सिट सर्वतोपरी सहकार्य करेल असे ते यावेळी म्हणाले.

हा कार्यक्रम रॉयल एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, प्रा. आय. एम. काझी तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा. माया गायकवाड यांनी केले.