कॉक्सिटच्या विद्यार्थ्यांना टीसीएसचे 'वेबीनारमधून' मार्गदर्शन

Friday July 08, 2016


11:00AM – 01:00PM

कार्यक्रम माहिती

कार्यक्रम समन्वयक:

प्रा. किशोर जेवे
(टीपीओ, कॉक्सिट, लातूर )
प्रमुख उपस्थिती:




1) डॉ. एम. आर. पाटील
2) डॉ. एन. एस.झुल्पे
3) प्रा. डी. एच. महामुनी
4) प्रा. कैलास जाधव
5) प्रा. किरण सुर्यवंशी

लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) टीसीएस सॉफ्टवेअर कंपनीकडून टीसीएस कोडविटा स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना वेबीनार या ऑनलाईन व्हिडिओ सेमीनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

कॉक्सिटमध्ये टीसीएसकंपनीतर्फे वेबीनार (ऑनलाईन व्हिडिओ सेमीनार) घेण्यात आले. टीसीएस ही अग्रगण्य एमएनसी सॉफ्टवेअर कंपनी असून जगभरात प्रोग्रॅमिंग कोडिंगची 'टीसीएस कोडव्हिटा' स्पर्धा घेत आहे. यामध्ये जगभरातील ८०,००० कॉलेजच्या टीम यामध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये कॉक्सिटलाही सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. यामुळे डिजीटल माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानकौशल्यात वृध्दीगंत करण्याची संधी मिळाली आहे. या वेबीनारमध्ये टीसीएसच्या तज्ञांनी कोडिंग व अल्गोरिदमची कशी तयारी करायची आहे, स्पर्धेचे स्वरूप या विषयी विस्तृत माहिती दिली. यानिमित्ताने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डिजीटल शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. कोड व्हिटा या स्पर्धेत कोडींग व अल्गोदिरिमचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविणे अपेक्षित असते. या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून पहिल्या ३००० यशस्वी प्रोग्रॅमरला टीसीएसमध्ये थेट नोकरीची संधी देण्यात येते. दि.२९ व ३० जुलैला ही स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. कॉक्सिटमध्ये स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना स्वतंत्र मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वेबीनारचे समन्वयक म्हणुन टीपीओ प्रा.किशोर जेवे यांनी काम पाहिले. यावेळी प्रा.डी.एच.महामुनी, प्रा.कैलास जाधव, प्रा.किरण सुर्यवंशी तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर , विद्यार्थी उपस्थित होते.

कॉक्सिट विद्यार्थ्यांना ग्लोबल स्पर्धेसाठी सक्षम करण्यासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत आहे. आगामी काळातही कॅम्पससाठी नामांकित कंपन्या येणार असल्याची माहिती माजी प्राचार्य तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांनी कोड व्हिटा स्पर्धेत सहभागी होवून प्रतिभा व संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.एन.एस.झुल्पे यांनी केले आहे.