कॉक्सिटमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न्

मंगळवार 04 फेब्रुवारी, 2020


03:30 PM

कार्यक्रम माहिती

संयोजक :
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, लातूर
प्राचार्य :

डॉ. एन. एस. झुल्पे,
कॉक्सीट, लातूर
प्रमूख पाहूणे :

श्रीमती एस.डी.कंकणवाडी
सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण

कॉक्सिट अर्थात संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, लातूर यांच्या वतिने दि. 04 फेब्रूवारी रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा.न्यायाधीश श्रीमती एस.डी.कंकणवाडी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी माहितीचा अधिकार, ऑनलाईन तक्रार नोंदणी , व्यक्तीच्या जन्म प्रमाणपत्रापासून मृत्यूप्रमाणपत्रापर्यंत सर्व कायदेविषयक बाबींची माहिती विधी सेवा प्राधिकरणातून मिळते. अशी माह‍िती त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना दिली.

तसेच कार्यक्रमास उपस्थित पोलिस निरिक्षक श्री.बंकवाड यांनी विद्यार्थ्यांना आरटीओने विकसीत केलेले महा ट्रॅफिक ॲप याबदल माहिती दिली. तर ॲड. छाया आखाते मॅडम व ॲड.सूरेश सलगरे यांनीही विद्यार्थ्यांना विविध कायदेव‍िषयक बाबींची माहीती दिली.

अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ.एन.व्ही.मोरे यांनी या कायदेविषयक जनजागृतीचा विदयार्थ्यांना फायदा होईल व जिल्हा न्यायालयाच्या या स्तूत्य् उपक्रमाबदल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील व महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.झूल्पे यांच्या वतीने जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले. यावेळी रॉयल एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील महाविदयालाचे उपप्राचार्य प्रा.आय.एम.काझी, प्रा.डी.एच.महामूनी, प्रा.जे.आर.कावळे, प्रा.एल.आर.हावळे, प्रा.जे.एस.कूऱ्हे यांचीही उपस्थीती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अजय कलशेट्टी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.गणेश पवार यांनी केले.