कॉक्सिटच्या गुणवंतांचा सत्कार राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचे वाटप

Sunday, March 14, 2021


04:00 PM

Event Info

Organized by :
Department of Computer Science
Chairperson :

Dr. M. R. Patil,
President, Royal Education Society, Latur
Principal :

Dr. N. S. Zulpe,
COCSIT, Latur
Chief Guest :

Hon. Shri Sanjayji Bansode,
Minister,
Environment Water Supply and Sanitation Public
Works (Public Undertakings) Employment
Guarantee Earthquake Rehabilitation
Parliamentary Affairs
Venue :
Seminar Hall, COCSIT, Latur

About this Program -

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वा.रा.ती. म. विद्यापीठ नांदेड द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी-2020 परीक्षेच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत आलेल्या 13 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संगणकशास्त्रात दबदबा निर्माण करणाऱ्या कॉक्सिट महाविद्यालयाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बनसोडे बोलत होते. कॉक्सिटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांचा मी माजी विद्यार्थी आहे. त्यांच्या तालमीत मी वाढलो असल्याने त्यांची शिस्त व काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे. सरांच्या कष्टातून व सातत्यातून आज कॉक्सिट नावारुपाला आले आहे. लातूर जिल्ह्यातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञानातील अनेक अभ्यासक्रम त्यांनी लातूरमध्ये आणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. या महाविद्यालयातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर लगेच नोकऱ्या मिळालेल्या आहेत. कॉलेजच्या शुभारंभापासून आजपर्यंत महाविद्यालयाची उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यात नवनवीन विक्रमही प्रस्थापित केले आहेत. दरवर्षी अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकतात. त्यामुळे लातूर पॅटर्नचे नाव उंचवण्यामध्ये कॉक्सिटचा सिंहाचा वाटा आहे. कॉलेजचे शासन दरबारी कुठलीही समस्या अथवा अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी मी आपल्या सोबत कायम आहे, असे सांगून त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कॉलेजच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील सर बोलताना म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील जास्तत जास्त विद्यार्थ्यांना संगणशास्त्र क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे उत्तम व चांगले शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. ट्रेनिंग टील प्लेसमेंट म्हणजे नोकरी मिळेपर्यंत प्रशिक्षण हे ब्रीद घेऊन संस्था 2001 पासून कार्यरत आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना नोकरीसाठी किंवा स्पर्धापरीक्षांसाठीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने इंटरव्ह्यु कसा द्यावा, विद्यार्थ्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ग्रुप डिकशन, गेस्ट लेक्चर, स्टेज करेज यासारख्या गोष्टीवर भर देऊन महाविद्यालयाचा विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. आजपर्यंत कॉलेजने कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून अनेक नामांकित कंपन्यांना कॅम्पस मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये आणले आहे. या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना देशात-विदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोकरी मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमच्या कामाची पावती आहे.

यशस्वी विद्यार्थी

बी.एस्सी. सी.एस. या अभ्यासक्रमातून सुहासी रामधवे सर्वप्रथम, अदिती कुलकर्णी सर्वद्वितीय, सिमरन तांबोळी सर्वतृतीय, बी.सी.ए. या अभ्यासक्रमातून सुरज चौधरी सर्वप्रथम, पूजा जाधव सर्वद्वितीय, उमेश बिराजदार सर्वतृतीय, बी.एस्सी. सॉफ्टवेअर इंजिनिअरींग या अभ्यासक्रमातून सुमित्रा दुधाळे सर्वप्रथम, बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून पूजा गुंडुरे सर्वद्वितीय, क्रांती सोमवशी सर्वतृतीय, एम.एस्सी. सॅन या अभ्यासक्रमातून माधव आगलावे सर्वप्रथम, एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून निकिता सोनकांबळे सर्वप्रथम, वैष्णवी मोरे सर्व द्वितीय तर इब्राहीम पहाडवाले याने सर्वतृतीय येण्याचा मान पटकविला आहे.