कॉक्सिटमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाालेल्या विद्यार्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा

Sunday, September 08, 2019


11:00 AM To 04:00 PM

Event Info

आयोजक :
कॉक्सिट महाविद्यालय लातूर
अध्यक्ष :
डॉ. एम. आर. पाटील
प्रमुख पाहुणे :
डॉ. के. बी. भोसले
पालक प्रतीनिधी :
श्री. आनंदभाई वैरागे
प्राचार्य :
डॉ. एन. एस. झुल्पे
उपप्राचार्य :
डॉ. बी. एल. गायकवाड
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव
स्थळ : कॉक्सिट लातूर

About this Program -

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी 2019 परिक्षेमध्ये संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट) मधील 14 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यामार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस व ऑफ कॅम्पस मुलाखतीमध्ये 64 विद्यार्थ्यांची निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचा माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशनराव भोसले यांच्या हस्ते कॉक्सिटमध्ये गुणगौरव व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, डॉ. एम. आर. पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. बी. भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, पालक प्रतीनिधी श्री. आनंदभाई वैरागे व ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. के. बी. भोसले यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये बोलताना, महाविद्यालयाच्या उत्तूंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, पालकांचे व महाविद्यालयाचे अभिनंदन केले, तसेच ते म्हणाले मराठवाड्यात कॉक्सिट हे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करुन देणारे एक व्यासपीठ आहे. तसेच विद्यापीठ परीक्षेच्या गुणवत्ता यादीत दरवर्षी विद्यार्थी येण्याचा आजपर्यंतचा या महाविद्यालयाचा प्रवास हा अभिमानास्पद आहे.

तसेच महाविद्यालयाचे संस्थाअध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या उभारणीपासून आजपर्यंत घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील सर अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, कांही विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्तायादीमध्ये येऊनदेखील कँम्पस मुलाखतीमध्ये निवडले जात नाहीत ही विचार करण्याची गोष्ट आहे. अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी चर्चा करावी, त्यांना ज्या अडचणी असतील त्यांची तयारी करवून घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु असे आवाहन त्यांनी केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थी जॉबरेडी कसा बनेल, यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे व राहील. विद्यार्थ्यांच्या यशासाठी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनीही त्यांच्याकडे जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे आहे, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना जॉबरेडी बनविण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीमध्ये उपयोगी असलेले विषय म्हणजे कम्युनिकेशन स्कील, लॉजीकल रिझनिंग, कॉन्टीटेव्ह ॲप्टीट्युड, मॉक इंन्टरव्यु इत्यादीचे निशुल्क प्रशिक्षण दिले जाते. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. गणेश पवार व प्रा. माया गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.