"कॉक्सिट" ला नॅकचे बी प्लस मानांकन जाहीर

Friday, September 10, 2021


Event Info

About this Program -

लातूर - संगणकशास्त्रातील अग्रेसर महाविद्यालय म्हणून परिचित असलेल्या लातूर येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाला (कॉक्सिट) नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यांकनात बी प्लस मानांकन मिळाले आहे.याबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मूल्यमापन परिषद (नॅक) यांच्यामार्फत 1000 गुंणांच्या मापनपद्धतीतील,संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट) चे 670 गुणांचे मुल्यांकन नॅकद्वारेच आऊटसोर्सींग करुन थर्ड पार्टीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले,व उर्वरीत 330 गुणांच्या मुल्यांकनासाठी नॅकतर्फे तीन तज्ज्ञांच्या टीमने येथे समक्ष येवून मूल्यांकन केले.यात कोइंबतूर येथील डॉ. के.मुर्गन, बंगळुरू येथील डॉ.निरंजन राज व दिल्ली येथील डॉ. महम्मद अल्ताफ खान यांचा समावेश होता.या टीमने कॉक्सिटमधील सर्व सुविधांची पाहणी केली,त्यांनी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत,अत्याधुनिक साधनांचा पुरेपूर वापर,व्यायामशाळा,सौर ऊर्जा प्रकल्प, सुसज्ज संगणकशास्त्र प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, ऑनलाइन शिकवणी पध्दत या बाबींची पाहणी केली. महाविद्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे विशेष कौतुक केले. महाविद्यालयातील सर्व बाबींची पाहणी करून गेल्यानंतर या टीमने त्यांच्या अहवाल नॅक कार्यालयास जमा केला असता दोन्ही स्तरावर महाविद्यालयास मिळालेल्या गुणांनुसार महाविद्यालयाला बी प्लस मानांकन नॅकद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे. यापूर्वी महाविद्यालयास सी.जी.पी.ए. 2.58 (63.5%) बी मानांकन प्राप्त होते. त्यात आता वाढ होवून नवीन मुल्यमापन प्रणालीनुसार सी.जी.पी.ए. 2.68 (67%) बी. प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या मानांकनात वाढ झाल्याबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील यांनी प्राचार्य डॉ.एन.एस. झुल्पे,आयक्यूएसी समन्वयक प्रा. कैलास जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्रा. डी. आर.सोमवंशी, विभाग प्रमुख डी. एच. महामुनी, प्रा. आय. ए. पाटील, प्रा. एस. व्ही. देशमुख, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तानाजी खरबड, कार्यालय अधिक्षक संतोष कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.