1-Day State Level Workshop on "Intellectual Property Rights"

Thursday, December 26, 2019


10:30 AM To 05:30 PM

Event Info

Organized by :
College Management
Chairperson :

Dr. M. R. Patil
President, Royal Education Society, Latur
Principal :

Dr. N. S. Zulpe
COCSIT, Latur
Resource Person :
1) Mr. Vijaykumar Shivpuje
Director, Patlex Bussiness Solutions, Latur

2) Mr. M. M. Betkar
Principal, Shri Kumarswami Mahavidyalay, Ausa
Co-Ordinator :

Mrs. D. H. Mahamuni
HoD, Computer Science, COCSIT, Latur
Venue :
COCSIT, Latur


लातूर येथील कॉक्सिट अर्थात संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दि. 26 डिसेंबर 2019 रोजी बौद्धिक मालमत्ता अधिकार (आय.पी.आर.) या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली, यामध्ये एकूण 30 प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे मार्गदर्शन पॅटलेक्स सोल्युशनचे संचालक श्री. विजयकुमार शिवपूजे यांनी केले. त्यामध्ये ट्रेडमार्क्स व ट्रेडसिक्रेटस् या विषयावर बोलताना त्यांनी ट्रेडमार्क्स चे प्रकार, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक बाबी, त्यासंबंधी भारतीय संविधानातील कॉन्टेक्स ॲक्ट यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुस-या सत्रामध्ये कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांनी पेटेंन्टस व कॉपीराईटस् या विषयावर बोलताना पेटेन्टस् रजिस्ट्रेशन करण्याची पद्धती, पेटेन्टस कार्यप्रणाली, पेटेन्टस् व कॉपीराईटस यामधील फरक इत्यादी बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा समारोप सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र वितरीत करुन झाला. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर, प्रा. आय. एम. काझी, डॉ. एन. व्ही. मोरे, कार्यशाळा समन्वयक श्रीमती डी. एच. महामुनी यांची उपस्थिती होती. ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. ज्योती कावळे व प्रा. कोमल गोमारे यांनी परिश्रम घेतले. ही कार्यशाळा रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली. त्याबद्दल कार्यशाळेच्या समन्वयक श्रीमती डी. एच. महामुनी यांनी त्यांचे आभार मानले.